तीनशे रुपयांची लाच भोवली, महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। उतार्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भुसावल तालुक्यातील साकरी येथील महिला तलाठ्यास जळगाव येथील एसीबीच्या पथकाने आज दि ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रंगेहात अटक केल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे
यातील तक्रारदार यांनी सजा खडका हद्दीमध्ये प्लॉट खरेदी केलेला आहे त्यामुळे तक्रारदार हे सदर प्लॉटचे इंडेक्स-२ व खरेदीखत घेऊन ७/१२ उताऱ्यावर नाव लावणेसाठीच्या विहीत अर्जासह खरेदी केलेल्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तलाठी, सजा खडका व साकरी ता.भुसावळ कार्यालयात अर्ज सादर केला असता तक्रारदार यांचेकडे नविन खरेदी केलेल्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठीचा अर्ज दाखल करून घेण्याच्या व ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्याच्या मोबदल्यात तलाठी, सजा खडका व साकरी ता.भुसावळ या गावातील महिला तलाठी मनिषा निलेश गायकवाड, वय-३८, तलाठी, सजा खडका व साकरी ता.भुसावळ जि.जळगाव. (वर्ग-३) रा.मोरेश्वर नगर, साकेगाव शिवार, भुसावळ ,ता.भुसावळ जि .जळगाव . यांनी तक्रारदारास तीनशे रुपयांची लाच मागितली असता त्यांना जळगाव येथील एसीबी पथकाने सापळा रचून खडका येथील कार्यालयात लाच घेताना रंगेहात अटक केली,
या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदरच्या सापळा कारवाईत जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील, नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर,किशोर महाजन, प्रणेश ठाकुर, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, यांचा सहभाग होता .