हद्दपार आरोपीस गावठी कट्ट्यासह अटक
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या आतीश रवींद्र खरात यास आदेशाचे उल्लंघण करीत शहरात आल्या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री शहर हद्दीतून अटक केली. संशयीताच्या ताब्यातून गावठी कट्टादेखील जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, संशयीताला बुधवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. भुसावळ शहरातील समता नगर चौकात जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला संशयीत आतीश रवींद्र खरात,25, समता नगर, भुसावळ, ह.मु.अकोला,हा आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. संशयीत आतीशला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अंग झडतीत गावठी कट्टा आढळल्याने तो जप्त करण्यात आला.संशयीत आतीशला बुधवार, 7 डिसेंबर रोजी भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.