रावेर मध्ये नाराजी नाट्य, राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राजीनामा,संतोष चौधरी अपक्ष उमेदवारीच्या तयारीत
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ तालुका, रावेर तालुका, वरणगाव येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राजीनामा सत्र सुरू झाले आहे. व रावेर लोकसभा मतदार संघात अजूनही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी राजीनामे देतील, जूने कार्यकर्ते माजी आमदार संतोष चौधरी यांना लोकसभेची उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेल्या श्रीराम पाटील याना उमेदवारी दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केले आहे. तसेच उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी हे नाराज असून चौधरी हे अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड करण्याच्या तयारीत आहेत.
कार्यकर्त्यांचा असाही आरोप
तीन महिन्यात तीन पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीला यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे. संतोष चौधरी यांची जी लोकप्रियाता होती, व आहे ,त्यांना तिकीट जाहीर झाल्या बरोबरच लोकांमध्ये जो उत्साह निर्माण झाला होता त्यावर विरजण फिरवण्याच काम पक्षा कडून करण्यात आले आहे. तिकीट देताना घेतलेला निर्णय यात कुठेतरी फेरविचार करण्याची गरज आहे कारण जो मनुष्य ज्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा अनुभव नाही, त्याना येवढ्या खासदारकी पदाची, प्रशासकीय कामांचा काय अनुभव आहे. असा आरोप कार्यकर्त्यांनी मीडिया समोर केला आहे.