भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळशैक्षणिक

“कमवा -शिका ही योजना विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान फुलवणारी “-डॉ. जे. एफ. पाटील

भुसावल, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा । भुसावळ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भुसावळ मध्ये विद्यार्थी विकास विभाग, सामाजिक शास्त्र मंडळ आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील होते. तर प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ. जे. एफ. पाटील होते.

सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.डी. गोस्वामी समिती सदस्य प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख वक्ते डॉ पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना विद्यार्थ्यांच्या अंगी कष्ट करण्याचा गुणधर्म रुजून त्यातून अर्थार्जन करण्याचे शिकवून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविणाऱी योजना असा गौरव केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक क्षेत्रात अनेक नामवंत व्यक्ती घडल्याची उदाहरणे त्यांनी आपल्या भाषणात दिली.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्राच्या पायाभरणीतील योगदान किती महत्त्वपूर्ण आहे याचा उल्लेख करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. ए. सोळुंके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.एस. के. राठोड यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. एस टी धूम प्रा राठोड, प्रा. डॉ. मनोज पाटील प्रा. डॉ. राजेंद्र तायडे प्रा. डॉ. पुरुषोत्तम महाजन, प्रा. डॉ. दीनानाथ पाठक,प्रा. गौतम भालेराव , प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले,प्रा. डॉ. सचिन राजपूत प्रा. सुनिल अडकमोल यांनी सहकार्य केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!