भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावल मध्ये जप्त केलेला २ कोटी २७ लाख रुपयांचा गुटखा जाळला

भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भुसावळ-साकेगाव रस्त्यावर १ एप्रिल शुक्रवार रोजी राजस्थानातून जळगावकडे जाणारा तीन कंटेनर गुटख्याचा साठा तत्कालीन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात पथकाने पकडला
तीन कंटेनरमधून २ कोटी २७ लाख रुपयांचा गुटखा तसेच १ कोटी २३ लाख रुपये किंमतीचे तीन कंटेनर असा एकूण साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. या वेळी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.

पोलिसांच्या तपासात या गुटख्याचे राजस्थान कनेक्शन समोर आले होते राजस्थानहून हा गुटखा जळगावकडे येत असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते तर विशेष म्हणजे कंटेनर चालकांना केवळ मोबाईलद्वारे वाहन कुठे न्यायचे याच्या सूचना दिल्या होत्या.

जप्त गुटखा पोलिसांच्या ताब्यात असल्याने भुसावळ सत्र न्यायालयाने त्यास नष्ट करण्याचे म्हणजे जाळण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी डंपिंग ग्राऊंडवर पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, जळगाव एलसीबी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक बबन जगताप, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शरद पवार, सरकारी पंच आदींच्या उपस्थितीत हा दोन कोटी सत्तावीस लाख रुपयांचा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!