भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या भुसावल येथील माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

भुसावल येथील तत्कालीन नगराध्यक्ष रमण भोळे आणि ११ नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला त्या नगरसेवकांच्या अपात्रता प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे. यात काल झालेल्या सुनावणीत ११ नगरसेवकांच्या ऍड. हरीश पाटील व ऍड. महेश भोकरीकर या दोन्ही वकिलांनी आपण आजारी असल्याचे सांगून शुक्रवारची सुनावणी तहकूब करण्याबाबत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून
आता पुढील सुनावणी १ जुलै रोजी होणार आहे, १ जुलै रोजी अपात्रतेच्या मागणीवर अंतीम निकाल येणार, हा निकाल काय लागतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!