सातबारा उताऱ्यावर नोंदी साठी लाच घेताना कोतवलासह खाजगी इसम एसीबी च्या जाळ्यात
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील तक्रारदार यांनी सन 2022 मध्ये ता . भुसावळ जि . जळगांव मधील कुऱ्हे पानाचे या गावात स्वतःच्या नावे सु .2 एकर. शेतजमीन विकत घेतली आहे .सदर शेत जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर तक्रादार यांचे स्वतःचे नावं लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुऱ्हे पानाचे येथे प्रकरण सादर केले होते.
सदर प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी त्रुटी काढून तक्रारदार यांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटण्यास सांगितले होते . त्या प्रमाणे तक्रारदार हे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटले असत त्यानी तक्रारदार यांना मी तुमचे 7/12 च्या उताऱ्यावर नावं मंडळ अधिकारी योगिता पाटील यांच्या कडून करून आणुन असे सांगून 15000 रुपयांची मागणी केली त्या बाबत तक्रारदार यांनी दिनांक 18/4/23 रोजी ला. प्र. वि.जळ्गाव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी च्या अनुषंगाने पंचसमक्ष पडताळणी केली असता यातील कोतवाल धांडे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्या कडे प्रथम 15000 रु.व तडजोडीअंती 12000 रु लाच रकमेची मागणी करून हरीश ससाणे (खाजगी इसम )यांचे कडे देण्यास सांगितले.
त्या प्रमाणे ससाने यांनी तक्रारदार यांचे कडून 12000 रुपये स्वतःपंचा समक्ष स्वीकारले असता रविंद्र लक्ष्मण धांडे , वय-54 वर्ष, कोतवाल, सजा तलाठी भुसावळ हल्ली नेमणूक तहसिल कार्यालय, भुसावळ ता.भुसावळ जि.जळगाव. (वर्ग-4) रा.भुसावळ ता.भुसावळ जि.जळगाव, हरिष देविदास ससाणे, वय-44 वर्ष, रा.आंबेडकर नगर भुसावळ ता.भुसावळ जि. जळगांव (खाजगी इसम) यांना रंगेहात पकडण्यात आले . यांचे विरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे .
कारवाई संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि जळगांव. स.फौ./दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ ,स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल पाटील,पो.कॉ.राकेश दुसाने , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.यांनी सहभाग घेतला.