भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

संतापजनक ; प्रियकरासह बापाचा स्वतःच्या मुलीवर अत्याचार

वरणगाव,ता.भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका अल्पवयीन मुलीची एका तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाली,ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले नंतर मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मुलगी घरी न आल्याने याबाबत मुलीच्या वडिलांनी मुलगी हरविल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसानी तिचा शोध घेतला. यानंतर मुलीने आपल्या जाबाबात धक्कादायक माहिती दिली. प्रियकराने आणि त्याच्या बापाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आले असून त्या दोघांना पोलिसांनी अटक केले आहे.

वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावल तालुक्यातील वरणगाव पोलिसस्टेशन हद्दीतील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे फेसबुकवर एका सोबत प्रेमाचं सुत जुळल्याने ती व तीचा प्रियकर दि. २९ सप्टेबर गुरुवार रोजी घरातून पळून गेले होते. ही गोष्ट मात्र बापला माहित नसल्याने वरणगाव पोलीस स्टेशनला मूलगी सकाळी दहा वाजेला सायकलीने कॉलेजला जाते म्हणून सांगून गेली होती, संध्यकाळ सहा वाजेपर्यत मूलगी घरी आली नाही म्हणून नातेवाईकांसह शोध घेत असताना तीची सायकल गवतात पडलेली दिसली. मात्र मूलीचा शोध लागलाच नसल्याने बापाने मूलीच्या हरविलेल्या बाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेत गुजरातमधील सोरटी सोमनाथ येथून घेऊन आले होते. दरम्यान त्या मूलीला बाल कल्याण समितीकडे पाठविण्यात आले .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!