भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळशैक्षणिकसामाजिक

नाहाटा महाविद्यालया तर्फे ‘महादेव माळ’ येथे ‘खेड्याकडे चला ‘ अभियान संपन्न

भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ, हिंदी विभाग, इतिहास विभाग, मराठी विभाग व तत्त्वज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुक्यातील महादेव माळ येथे २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ‘खेड्याकडे चला’ हे स्वच्छता अभियान संपन्न झाले.

यात अभियानाच्या पहिल्या सत्रात सुरुवातीला अर्थशास्त्र विभागातील व नियोजन अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य प्राध्यापक तसेच इतर विभागातील प्राध्यापक वृंद व अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी यांनी महादेव माळ येथील जि. प. शाळा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या महान विभूतींना अभिवादन करण्यात आले. यानंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी गावात जाऊन ग्रामीण जीवनशैलीची पाहणी केली.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापिका शिवानी माळी यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत व्याख्यान दिले. त्यानंतर इतिहास विभागाचे प्राध्यापक अदनान शेख यांनी माजी दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आठवणींना उजाळा दिला. व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी सह वन भोजनाचा आनंद घेतला आणि अभियानाची सांगता करण्यात आली.


या अभियानाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. ब-हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. एस. टी. धुम, प्रा. जितेंद्र आडोकार, प्रा. अक्षरा साबळे, प्रा. सुनील अडकमोल यांनी परिश्रम घेतले. अभियानात अर्थशास्त्र विभागांतील विद्यार्थ्यांसह हिंदी विभागातील प्रा. डॉ. मनोज पाटील, प्रा. डॉ. प्रियंका महाजन, तसेच इतिहास विभागातील प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले, प्रा. श्रीपाद वाणी प्रा. गौतम भालेराव, प्रा. डॉ. सचिन राजपूत, आदी सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!