पिण्यासाठी आणलेली दारू पत्नीने पिल्याच्या कारणाने पतीने केला पत्नीचा गळादाबून खून
वरणगाव,ता.भुसावल.मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पिण्यासाठी घरात आणलेली दारू एका महिले सोबत पत्नीने पिऊन संपविली. याचा राग धरून रागातच पतीने पत्नीचा गळादाबून खून केल्याची खळबळजनक घटना भुसावल तालुक्यातील हतनूर धरणाजवळ हतनूर येथे घडली.
मूळचा उत्तरप्रदेश मधील रहिवासी असलेला जितेंद्र गंगाराम हेमब्रम ( रा. उत्तरप्रदेश, ह.मु. हतनुर धरण, ता.भुसावळ) हा सध्या भुसावल तालुक्यातील हतनूर धरण येथे पत्नी शांतादेवी सह मजुरी करून एका पत्र्याच्या खोलीत राहतो. रविवारी दि १७ सप्टेंबर रोजी त्याने घरात दारू पिण्यासाठी आणून ठेवलेली होती. ही दारू पत्नी शांतीदेवी हेमब्रम यांनी एका महिलेसाबत पिली.
सदरची बाब जितेंद्र च्या लक्षात आल्याने त्याला याचा मोठा राग आल्याने जितेंद्र हेमब्रम याने घरातच पत्नी शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम (वय-४०) रा. उत्तरप्रदेश ह.मु. हतनुर धरण ता.भुसावळ हिला चापटा बुक्क्यांसह कमरेच्या पट्ट्याने मारहाण करत हाताने गळादावून तिचा खून केला. ही घटना रविवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी पती जितेंद्र गंगाराम हेमब्रम वय ४० वर्ष याला अटक करण्यात आली असून वरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी १८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि आशिष आडसुळे हे करीत आहे.