भुसावल तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस अटक
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भुसावळ तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला २०१९ ते आतापर्यंत तिला लग्नाचे आमिष दाखवत त्याच गावात राहणारा रुपेश मंगल पाटील याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच ” तू माझ्यासोबत नाही आली तर तुझ्या घरच्या लोकांना त्रास देईल” अशी धमकी दिली. त्यामुळे तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला नाही. दरम्यान २ ऑगस्ट रोजी हा प्रकार तिला असह्य झाल्याने आपल्यावर झालेली आपबिती तिने घरच्यांना सांगितला. त्यानुसार तिच्यासह नातेवाईकांनी बुधवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी रुपेश मंगल पाटील यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णा पिंगळे करीत आहे.