लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून जबरजस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत अल्पवयीन मुलगी चार महीन्याची गर्भवती झाली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, चार महिन्यापूर्वी गेल्या जानेवारी महिन्यात इमरान मुख्तार सैय्यद,वय २२ वर्ष याने सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मामाच्या घरी पिडीतेस इशाऱ्याने बोलवून पिडीतेस ‘मी तुझ्या सोबत लग्न करणार, असे सांगून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नव्हे तर पिडीत तरुणीसोबत सेल्फी फोटो काढून इन्टाग्रामवर स्टोरी ठेवत व्हायलर केले. आता पिडीता चार महीन्याची गर्भवती असून या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि प्रकाश वानखडे हे करीत आहेत.