उच्चभ्रू वस्तीत वेश्याव्यवसाय, भुसावळ मध्ये सहा तरुणींची सुटका
भुसावळ,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ भुसावळ शहरातील महेश नगर या भागात गेल्या अनेक दिवसांपासून गुपित वेश्यव्यवसाय होत असल्याच्या माहितीवरून भुसावळ शहराचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने पळत ठेऊन आज रविवार दि.३ मार्च रोजी धाड टाकून सहा तरुणींची सुटका केली.
यात देह व्यापार चालविणारे विशाल शांताराम ब-हाटे (वय ३८) व त्याची पत्नी पल्लवी विशाल ब-हाटे (वय ३९, दोन्ही रा. महेश नगर, भुसावळ) या दाम्पत्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे व देह व्यापार करणा-या पिडीत पाच महिला करमाळा, जि. सोलापुर, ह.मु. मगरपट्टा पुणे, जामखेड, जि. अहमदनगर, पहुर, ता. जामनेर, जि. जळगांव, पिंपरी चिंचवड, पुणे, कुलाबा, मुंबई येथील राहणा-या व दोन इसम मिळुन आले आहेत.माइंड अँड बॉडी स्किन केअर स्पा या बॅनरच्या नावाखाली महिलांकडून देह विक्री व्यवसाय येथे सुरू होता.
महेशनगर हा परिसर भुसावळ शहरातील उच्चभ्रू वस्तीचा परिसर म्हणून ओळखला जातो, येथून भुसावळ व परिसरातील अनेक आंबटशौकीनांशी फोन द्वारे संपर्क साधला जात होता. पोलिस पुढील तपास करत असून ,ही कारवाई भुसावळ पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांचे मार्गदर्शना खाली शहर वाहतूक शाखेच्या सपोनी रुपाली चव्हाण, ए एस आय प्रदीप पाटील, शालिनी वलके, नंदकिशोर सोनवणे, अश्विनी जोगी यांच्या पथकाने केली.