क्राईमभुसावळ

विधवा महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल

वरणगाव,ता.भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भुसावल तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय विधवेशी अश्लील संवाद करत युवराज गणपत पवार याने मारहाण करीत विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की,भुसावल तालुक्यातील ३५ वर्षीय विधवा महिलेस दि ६ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास किराणा सामान घेत घरी येत असताना संशयित आरोपी युवराज गणपत पवार याने महिलेसोबत अश्लील संवाद साधला. पिडीत महिलेने विरोध केला असता तिच्या घरी जात संशयित आरोपी युवराज पवार याने पिडीतेला शिवीगाळ करीत मारहाण करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी युवराज पवार याच्या विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!