बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन तरुणीवर वेळोवेळी अत्याचार
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भुसावल शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून ‘सबको लाइन से मार डालुंगा’ अशी धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की भुसावळ शहर परिसरात शिक्षण घेत असलेल्या एका पंधरा वर्षीय तरुणीला आरोपी अजय गिरधारी गोडाले रा.भुसावळ याने
जुलै २०२१ ते जुलै २०२३ दरम्यान बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार घडला, याप्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यावरून बाजारपेठ पोलिसस्टेशनला आरोपी अजय गिरधारी गोड रा.भुसावल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स पो नि हरीश भोये करीत आहे.