वरणगाव येथील महिलेला अश्लिल फोटो व मँसेज पाठवून विनयभंग
भुसावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भुसावल तालुक्यातील वरणगाव येथील एका ३२ वर्षीय महिलेला व्हाट्सएपच्या माध्यमातून अश्लिल फोटो व मँसेज पाठवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, अशोक चौधरी रा. चंदू अण्णा नगर , जळगाव याने दि. २९ एप्रिल २०२२ रोजी ते दिनांक ४ मे २०२२ रोजी पावेतो वेळोवेळी वरणगाव ता.भुसावल येथील ३२ वर्षीय महिलेच्या व्हॉट्सअपवर त्याच्या मोबाईलवरून वेळोवेळी रात्री अपरात्री अश्लिल फोटो व अश्लिल मँसेज पाठवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने या बाबत सादर महिलेने पोलिसस्टेशनला तक्रार दिल्याने वरणगाव पोलिसस्टेशनला अशोक चौधरी ,रा.चंदूअण्णा नगर,जळगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास सुरू आहे.