भुसावल मध्ये अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका अल्पवयीन मुलीशी मैत्री करून जबरी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावल शहरात समोर आला
भुसावळ शहरातील संशयित आरोपी राज लोणारी याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस मोबाईल फोन वरून संपर्क साधून अल्पवयीन मुली सोबत मैत्री करून मुलीला विश्वासात घेऊन तापी नगर मधील फोटो गॅलरी मध्ये संबंध करून त्यास नकार दिला असता आरोपी राज लोणारी, राहणार भुसावळ याने पीडितास त्यांच्या मोबाईल मधील फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. पीडितांचा पाठलाग करून घरात प्रवेश करून अंगलट करून तिच्या गालावर हात फिरवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व पीडितांच्या आई-वडिलांस जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुन १५९/२०२२ कलम ३७६,३५४(ड)४४८,५०६ बाल लैगिंक अत्याचार कलम ४,८,१२ प्रमाणे भुसावल शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.