भुसावळ मध्ये अवैध देशी दारूचा मोठा साठा जप्त !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा | शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडवरील कोटिंग फर्निचर सुरू असलेल्या अवैद्य देशी दारूच्या गोडाऊनवर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील पथकाने टाकलेल्या धाडीत अवैध देशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे आणि श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला भुसावळ शहरात अवैध देशी दारू मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार आज शनिवारी सायंकाळी पथकाने शिरपूर-कन्हाळा रोडवरील गणेश कोटींग अँड फर्निचर या गोडाऊनवर छापा मारला असता देशी दारूचा खूप मोठा साठा करण्यात आला असल्याचे या पथकाला आढळून आले. या ठिकाणी पथकाने पाहणी केली असता येथे बनावट देशी दारू तयार केली जात असल्याचे दिसून आले. येथे बनावट दारूसाठी लागणारे रसायन, बॅरल्स आदी सामग्री आढळून आली. तर तयार केलेल्या देशी दारूचे साधारणपणे साडे तीनशे बॉक्स एकूण 11 लाख रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे.