माझ्याशी पाच मिनिटं बोल…शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग
वरणगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। विद्यार्थिनीचा पाठलाग करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याचा प्रकार वरणगाव येथे घडला.
वरणगाव शहरातील एका विद्यार्थिनीला २१ सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान मुलगी शाळेत जात असताना निलेश राखुंडे यांनी तिचा पाठलाग केला. तिला रस्त्यामध्ये थांबवत माझ्याशी पाच मिनिटात बोल असे सांगून तिला लाजत उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. सदर प्रकाराबाबत पीडित विद्यार्थिनीने पोलिसस्टेशनला तक्रार दाखल केल्याने वरणगाव पोलिस स्टेशनला निलेश राखुंडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपुर्वीच तीन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतांना पुन्हा विनयभंगाचा प्रकार घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.