खडसे समर्थक नगराध्यक्ष व नऊ नगरसेवक अपात्रतेचा निर्णय नगरविकास खात्याकडून कायम
भुसावळ.मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भुसावल नगरपालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खडसे समर्थक नगराध्यक्ष व नऊ नगरसेवक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तक्रारी वरून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासाठी अपात्र घोषीत केले होते त्या निर्णयावर नगरविकास खात्याने शिक्कामोर्तब केल्याने
खडसे याना हा धक्का मानला जात आहे.
अधीक माहिती अशी की, सन २०१६ साली झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पर्टीच्या कमळ चिन्हावर रमण देवीदास भोळे हे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आले होते. तसेच त्यांच्यासोबत भाजपचे आणखी २५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र १७ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची मुदत पुर्ण झालेली नसताना तत्कालीन नगराध्यक्ष रमण देविदास भोळे यांच्यासह नगरसेवक बोधराज दगडू चौधरी, अमोल मनोहर इंगळे, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी रमेश मकासरे, शोभा अरूण नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, किरण भागवत कोलते, शैलजा पुरूषोत्तम नारखेडे, सविता रमेश मकासरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला . या बाबत
पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्यांकडे त्यांना अपात्र करावे या साठी अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकार्यांनी १८ जुलै २०२२ रोजी त्यांना अपात्र घोषित केले होते.
दरम्यान,नगराध्यक्ष व नऊ नगरसेवक यांनी जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयाला आव्हान देत नगरविकास खात्याकडे दाद मागितली असता दोन्ही बाजू चे म्हणणे ऐकून घेत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांनी अपील फेटाळून जिल्हाधिकार्यांचा निर्णय कायम ठेवत नागराध्यक्ष रमण देविदास भोळे यांच्यासह नगरसेवक बोधराज दगडू चौधरी, अमोल मनोहर इंगळे, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी रमेश मकासरे, शोभा अरूण नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, किरण भागवत कोलते, शैलजा पुरूषोत्तम नारखेडे, सविता रमेश मकासरे यांना पुढील सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढविण्यास मज्जाव केला.खडसे याना हा धक्का मानला जात आहे.