भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

पती रागावल्याचा राग अनावर झाल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पती आपल्यावर रागावले म्हणून रागावल्याच्या रागातून संतापाच्याभरात विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे घडली.

भुसावल जवळील दीपनगर वसाहतीत मनोज पिल्लाई हे मूळ केरळ चे रहिवासी असून ते औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील मेसमध्ये कामाला असून ते आपल्या पत्नी व मुलांसह वसाहतीत राहतात. पत्नी शरण्या पिल्लई ही आपल्या चार वर्षांच्या मुलास रागावली, म्हणून पती मनाेज हे पत्नीवर रागावले. त्याचा राग आल्याने शरण्या पिल्लाई वय २९ वर्षे यांनी संतापाच्याभारत राहत्या घरात बेडसीट पंख्याला बांधून गळफास घेतला. यावेळी पती दुसऱ्या रूममध्ये होता.

पत्नी दार उघडत नसल्याने त्याने आजूबाजूच्या लाेकांना बाेलावून दरवाजा ताेडला असता पत्नी शरण्या हीने गळफास घेतल्याचे समाेर आले. शरण्या हीने आत्महत्येपूर्वी तामिळ भाषेत चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पती आणि मुलगा तुम्ही दोघांनी खुश रहावे, असा उल्लेख त्या चिठ्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. माहिती मिळताच सहायक पाेलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, सहायक फाैजदार शामकुमार माेरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!