भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

रेशनचे तीन धान्य ‎गोदाम सील, रेशनचा माल असल्याचा संशय

भुसावल,मो डे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। भुसार मालाचे व्यापारी नाना ‎इंगळे यांचे तीन गोदाम रेशनचे धान्य ‎असल्याच्या संशयावरून प्रशासनाने सील ‎केले आहेत. ही कारवाई जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथे केली.शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही‎ कारवाई सुरू होती.‎ दरम्यान, या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथील व्यापारी इंगळे यांच्या गोद्री‎ रस्त्यावरील घराजवळ असलेल्या गोदामात‎ धान्य उतरवले जात होते. हे धान्य रेशनचे‎ असल्याच्या माहितीवरून पोलिस निरीक्षक‎ इंगळे यांनी घटनास्थळ गाठले. यानंतर‎ तहसीलदार अरुण शेवाळे यांनी पुरवठा‎ निरीक्षक वैराडकर व कर्मचाऱ्यांना‎ घटनास्थळी पोहचले. या गोदामासह‎ धामणगाव रोडवरील दोन गोदामे‎ प्रशासनाने सील केली. त्यापूर्वी‎ गोण्यांमधील धान्याचे नमुने घेण्यात आली आहेत. ‎तिन्ही गोदामात गहू, तांदूळ, तूर, मका‎ अशा स्वरूपाचे तब्बल तीन टन धान्य आहे. हा‎ माल शेतकऱ्यांकडून घेतल्याच्या पावत्या‎ आपल्याकडे आहेत, अशी माहिती‎ व्यापारी नाना इंगळे यांनी दिली. दरम्यान, याबाबत अद्याप कुठलाही गुन्हा दाखल ‎झालेला नसून, धान्य रेशनचे आहे किंवा‎ नाही याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर‎ पुढील कारवाई होईल असे सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!