अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वृद्धा कडून महिलेने उकळली खंडणी
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महिलेने एका ५७ वर्षीय वृद्धाचा व्हॉट्सअॅप कॉल करून नग्न व्हिडिओ शूट करून त्यानंतर त्याला तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून १० हजार ५८० रुपयांची खंडणी महिलेने उकळल्याची खडबडजनक घटना भुसावल मध्ये उघडकीस आली.
पीडित वृद्धाला २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास
अज्ञात महिलेने ८८७११५१५८२ या क्रमाकावरून वृद्धाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर ” हाय ” मॅसेज पाठवला.त्या नंतर व्हिडीओ कॉल करून महिलेने आपले स्वतः चे कपडे काढले व वृद्धालाही कपडे काढण्यास सांगितले वृद्धाने कपडे काढल्यानंतर तिने नकळत तो न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला.
त्या नंतर दुसर्या दिवशी वृद्धाला त्यांचा न्यूड व्हिडीओ फेसबुक, युट्युबवर व्हायरल करण्याची धमकी देत १० हजार ५८० रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे एनएफटीद्वारे आयडीएफसी खाते क्रमांक १००८७६२३३३०६ वर भरण्यास सांगितले.सदर वृद्धाने पोलिसस्टेशनला तक्रार केल्याने पिडीत वृद्धाच्या तक्रारीवरून ८८७११५१५८२ या क्रमाकाच्या अज्ञात महिलेविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.