भाजपच्या भुसावल शहराध्यक्ष पदी माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भाजपच्या शाहराध्यक्ष पदी माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांची तर प्रशांत पाटील यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. आमदार संजय सावकारे यांचे कट्टर समर्थक व त्यांचे निकटवर्तीय म्हणून युवराज लोणारी यांची ओळख आहे.
भुसावळ शहराच्या राजकारणाचा तीन दशकांपासून अनुभव असलेल्या श्री. लोणारी यांच्या नियुक्तीचा भाजपला संघटनात्मक वाटचालीत लाभ होईल असे मानले जात आहे. तर तालुक्याची धुरा प्रशांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल युवराज लोणारी व प्रशांत पाटील यांचे राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.