भुसावळात वाहतूक पोलिसांचे रोखीचे “टोल” नाके : ‘नोट दो.. आगे चलो’
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शहरात ठीक ठिकाणी जसे गांधी पुतळा चौक, नाहाटा चौफुली, फेकरी टोलनाका परीसरातील वाहतूक पोलिसांकडून प्रवाशांची अडवणूक केली जात असून वेगवेगळ्या कागदपत्रांच्या नावाखाली लूट केली जात असून वाहतूक पोलिसांनी खासगी टोलनाके सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ई-चालान’ प्रणाली दंडात्मक लागू केली असतांना वाहनचालकांकडून रोखीने पैसे (लाच) घेण्याचे प्रकार आताही सुरूच असून यामुळे नेहमीप्रमाणे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
- राज्यात पुन्हा दोन उपमुख्यमंत्री? परंतु मुख्यमंत्री कोण? उपमुख्यमंत्री कोण? केव्हा होणार शपथ विधी? महत्वाची माहिती आली समोर
- संपूर्ण जळगाव जिल्हा भगवामय, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ जागा महायुतीच्या ताब्यात
- मुक्ताईनगर मध्ये लक्षवेधी लढतीत पुन्हा महायुतीचे चंद्रकांत पाटील विजयी, रोहिणी खडसे पराभूत
भुसावळ येथील गांधी पुतळा चौक, फेकरी टोल नाका, नाहाटा चौफुली चारचाकी असो दुचाकी किंवा मालवाहू वाहनांना अडवून बाजूला घेतले जाते, चला लायसन्स काढा….गाडीची कागदपत्रे दाखवा… चला एव्हढा दंड भरा…..अन्यथा कारवाई करतो, अशी भीती दाखवत प्रवाशांना त्रास देण्याचं काम, सध्या शहराच्या प्रत्येक नाक्यावर सुरू आहे. या दरम्यान बराच वेळ तडजोड सुरू असते… मग शेवटी दंड रूपी रक्कम खाजगी तिजोरीत म्हणचे….खिशात… हे बिनधास्त सुरू असल्याने… या वर कमाईच्या हिस्स्यात आणखी कोणी सामील आहेत काय ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
वाहनधारकांचा अंदाज लावून पाहून त्यांना अडवले जाते. यासोबत सदरील ठिकाणी वाहतूक शाखेचे एक नव्हे तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक पोलीस थांबलेले असतात. एकानंतर एक गाडी अडवली जाते. क्वचितच एखादे वाहन वाहतूक पोलिसांच्या नजरेतून सुटते. तसेच वाहतूक पोलिसांनी मध्यप्रदेश व ईतर राज्यातील मालवाहून वाहनाना अडवून आपला खिसा गरम केला जातो. तसेच जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील येजा कारणारे मग चारचाकी असो दुचाकी गाड्याही अडवल्या जातात शाळकरी मुले व इतर सर्वांचा समावेश असतो वाहन चालकाला २००० हजार रूपये दंडाच्या धाक दाखवून ४०० पासून ५०० पर्यंत तडजोड केली जाते. याच महिन्या दरम्यान या प्रकरणाचा शिकार झालेल्या एका दुचाकीस्वाराने याबाबत ‘मंडे टू मंडे न्युज’ शी बोलतांना सांगितले मला गांधी पुतळा चौकात अडवण्यात आले मग विविध कागदपत्र मागण्यात आले त्यानंतर २००० रुपयांच्या दंडाचा धाक दाखवला भीतीदायक वातावरण निर्माण करत शेवटी तडजोडी अंती ४०० रुपये दे…मग जाऊ देऊ…या बोलीवर सोडण्यात आले. दिलेल्या ४०० रुपयांची कुठलीही पावती त्याला देण्यात आली नाही.
तसेच मुक्ताईनगर येथून भुसावळ येथे जाताना फेकरी येथील टोलनाक्याजवळही असेच प्रकार सुरू असून येथे चार ते पाच वाहतूक पोलीस दिवसभर थांबून असतांत वाहनांने टोल नाक्यावरील टोल दिल्यानंतर त्यांना पुढे येथील वाहतूक पोलीस अडवतात चालकांकडून् विविध कागदपत्राची मागणी जसे पियूसी, इन्शुरन्स, लायसन अशा कागदपत्राची मागणी करून २००० हजारांची पावती फाडण्याची दंडाचा धाक दाखवत वाहनधारकांकडून अक्षरशा दिवसाढवळ्या लुट केली जाते. ४०० ते ५०० रुपये खिशात दिले की घेऊन वाहन सोडले जाते. यामुळे वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे
या अत्यंत गंभीर प्रकाराबाबत अश्या वसुलीच्या टोल नाके उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघाचौरे यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून कुणाचे तरी अभय असल्याशिवाय दिवसाढवळ्या नेहमी वर्दळ असलेल्या भागांमध्ये असे खिसा गरम करण्याचे धंदे ? सुरू असणे शक्य नाही. त्यामुळे या प्रकाराला अंकुश लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात असून या अत्यंत गंभीर प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी त्वरित लक्ष दयावे अशी मागणी वाहनधारकांनकडून केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा