भुसावळात खाजगी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून रुग्णांची उडी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा | शहरातील खासगी हॉस्पीटलच्या आयसीयू कक्षामध्ये भरती असलेल्या रूग्णाने शुक्रवारी आज सकाळी दुसर्या मजल्यावरून उडी घेतली पळ काढण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून यात रुग्णास दुखापत झाली आहे.
यासंदर्भात माहिती अशी, शहरातील रिदम हॉस्पीटलमधील आयसीयूमध्ये दोन दिवसांपासून तळवेल येथील ४५ वर्षीय रूग्णावर उपचार सुरू होते. या रूग्णाने आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास मागील बाजूच्या खिडकीचे काच तोडून दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारल्यानंतर हा रूग्ण थेट रस्त्यावर पळत सुटला. मात्र त्या रूग्णाच्या आप्तांनी पाठलाग करून त्याला पुन्हा समजावून रिदम हॉस्पीटलमध्ये भरती केले असून दोन मजल्यावरून खाली उडी घेतल्याने या रूग्णाला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, सदरील रूग्णाने कशासाठी उडी घेतली हे अद्याप कळू शकले नाही.