अंतर्नादचे उपक्रम कायमच पथदर्शी – अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रघुनाथ सोनवणे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
भुसावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। गणेशाेत्सवात खर्चात बचत करून त्यातून घेतलेले शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल.अंतर्नादचे सर्वच उपक्रम समाजीक बांधिलकी जोपासून राबविले जातात त्यामुळे अंतर्नादचे काम नक्कीच सर्वांन साठी पथदर्शी आहे अशी भावना अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रघुनाथआप्पा सोनवणे यांनी येथे नमूद केली.
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशाेत्सवात ‘एक दुर्वा समर्पणाची’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी भुसावळ तालुक्यातील सुसरी आणि पिपळगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळे मधे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर घुले, सुसरी येथे सरपंच ऊर्मिला पाटील, उपसरपंच रवींद्र पाटील,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नयना पाटील मुख्याध्यापिका दिपाली भंगाळे, यांची तर पिंपळगाव येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील, ग्रा.प सदस्य नारायण कोलते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कृष्णा शिंदे, मुख्याध्यापक सुनिता महाजन, यांची उपस्थिती हाेती.प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले.प्रकल्प प्रमुख भूषण झोपे यांनी उपक्रमाचा उद्देश सांगितला तर आभार सहसमन्वयक विक्रांत चौधरी यांनी मानले.
९५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
शिक्षिका मीराताई जंगले, शारदा सुरवाडे, यांच्यासह योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, जिवन महाजन, समाधान जाधव, सुभाष इंगळे, अमित चौधरी, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे सहकार्य लाभले. शाळेतील इयत्ता पहिली ते चाैथीच्या ९५ विद्यार्थ्यांना पाट्या, वह्या, पेन्सील, पेन, खाेडरबर, रंगपेटी,स्केल असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष
गाेरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची गाेडी लागावी म्हणून गणेशाेत्सवाला या सामाजिक उपक्रमाची जाेड देण्यात आली आहे.अंतर्नादचे सदस्य हे स्वत: आणि मित्रमंडळींच्या सहकार्याने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.