भुसावळ विभागातील दोन दिवस ‘या’ रेल्वे गाड्या रद्द ! काही विलंबाने धावणारे : जाणून घ्या
मंडे टू मंडे न्यूज : भुसावळ (Bhusawal Railway Station) विभागातील पाचोरा रेल्वे स्थानकावर रिमाॅडलिंगची कामे केली जाणार आहेत. यामुळे मुंबई आणि पुण्याकडे जाणार्या काही प्रवासी रेल्वे गाड्या दोन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत.
मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ विभागातून मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या ४ रेल्वे गाड्या येत्या शनिवारी व रविवारी (१३ व १४ ऑगस्ट) रद्द करण्यात आल्या. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये इगतपुरी मेमू, सेवाग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे त्रिसाप्तहिक गाड्यांचा समावेश असून अप मार्गावरील व डाऊन मार्गावरील १२ गाड्या विभागातील विविध स्थानकांवर थांबवण्यात येणार असल्याने या गाड्या विलंबाने धावतील.
रद्द गाड्या–
१२१३६ नागपूर-पुणे त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १३ ऑगस्ट, १२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १४ ऑगस्टला, १२१३५ पुणे-नागपूर त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १४ ला पुणे येथून सुटणार नाही, १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू १४ व १५ रोजी भुसावळ, तर इगतपुरी-भुसावळ मेमू १५ व १६ आणि १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस १४ ऑगस्ट, तर १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १५ ऑगस्ट, १२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस १५ ऑगस्टला मुंबई येथून सुटणार नाही.
डाउन मार्गावर ४ गाड्यां विलंबाने
रविवार व सोमवार दोन दिवस मुंबईकडून भुसावळकडे येणाऱ्या (डाउन मार्ग) चार गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. त्यात १२६२७ बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस १.१० तास, ११०५५ एलटीटी-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस १.१० मिनिटे, १२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस २० मिनटे, ११०६१ एलटीटी-जयनगर पवन एक्स्प्रेस २० मिनिटे थांबवण्यात येईल.
अप मार्गावर ८ गाड्यांना मिळणार थांबा
२२४५६ कालका-साईनगर शिर्डी द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस २.१५ तास, २२५१२ कामाख्या-एलटीटी एसी साप्ताहिक एक्सप्रेस, १२१०८९ सीतापूर-एलटीटी, १७३२४ बनारस-हुबळी साप्ताहिक एक्स्प्रेस, ११०७२ बनारस-एलटीटी कामायनी एक्स्प्रेस या सर्व गाड्या २.१० तास, ११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेस ५० मिनिटे, २२५३७ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस ५० मिनिटे, ११०६२ जयनगर- एलटीटी पवन एक्स्प्रेस २५ मिनिटे थांबेल.
ज्या प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण म्हणजे बुकिंग केले आहे, त्यांना स्थानकावरील तिकिट खिडकी किंवा ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात तिकिटांचा परतावा मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा