भुसावळ घरफोडीत सात लाखाचा ऐवज चोरीला !
भुसावळ- शहरातील सिद्धी विनायक आय.टी.आय शिरपूर-कन्हाळा रस्त्यावरील प्रतिमा महेंद्र मगरे हे लॉकडाउन सुरू झाल्यापासून घराला कुलूप लावून बाहेर गावी अडकले होते. आजरोजी ते घरी परतले असता घरातील कुलुपाचे कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सात लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली असून घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी रवाना झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाउन लागल्याने भरपुर परिवार बाहेर गावी अडकून होते. या दरम्यान चोरचे प्रमाण मोठ्या प्रमाण वाढले होते.तर कोरोना झालेले रुग्ण उपचार घेत असतांना त्यांची घरी बंद असल्याने यांचा फायदा चोरट्यांनी घेऊन अनेक घरामध्ये लॉकडाउनच्या दरम्यान घरफोड्या केल्या होत्या.लॉकडाउनच्या काळात २० मार्चपासून ते अदयापवतो फिर्यादी प्रतिमा महेंद्र मगरे वय ४८ राहणार वैष्णवीनगर,सिद्धी विनायक आय.टी.आय शिरपूर कन्हाळा हे घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले असतांना अचानक सरकारने लॉकडाउन केल्याने फिर्यादी बाहेर गावी अडकल्या होत्या.आजरोजी ते आपल्या घरी आले असता त्यांच्या घराला लावण्यात आलेले कुलूप व कडी कोंडा कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,प्रभारी बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,सपोनि अनिल मोरे,पोना समाधान पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली घरातील सोन्याच्या वस्तू,टी.व्ही.एसी.असे ६ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २० मार्च २०२० ते अदयापावतो दरम्यान घडली असून बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग-५ गुरुन ८३७/२०२० भादवी कलम ३८०,४५७,४५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बाजारपेठ ठाण्याचे सपोनि अनिल मोरे सह पोना.समाधान पाटील करीत आहे.