भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

ब्रेकिंग : भुसावळ हादरले…, डोक्यात सिमेंटची कुंडी मारून खून, मध्य रात्रीचा थरार…!

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली. भुसावळ शहरातील नेब कॉलनी परिसरात रात्री उशीरा किरकोळ वादातून झालेल्या घटनेत एका तरूणाच्या डोक्यात सिमेंटची कुंडी मारून खून करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. भुसावळ शहरात खुनाचे सत्र अधून मधून सुरूच असल्याचे चित्र आहे.

मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील आनंद नगर भागाला लागून असलेल्या नेब कॉलनी भागात रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२ वर्ष) या तरूणाचा एकाशी किरकोळ वाद झाला. यातून झालेल्या बाचाबाचीत त्या तरुणाने अनिल उर्फ पिंटू सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची कुंडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला परिसरातील नागरिकांनी तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राहूल वाघ त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. या घटने प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!