भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात शॉर्ट सर्किट !

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दिपनगर येथे मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हॉपर हिटरच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ३० वर्षीय कर्मचारी भाजल्याची घटना घडली. 

याबाबत अधिक असे की, महानिर्मितीचा कर्मचारी  सचिन शिंदे (वय ३०) रा. दीपनगर हा दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ५०० बाय दोनच्या संचातील हॉपर हिटर दुरुस्तीचे काम करत असतांना अचानक शॉर्टसर्किट झाल्याने भाजला गेला. त्याच्या चेहरा, डावा हात, डोक्यावरील केस जळाले. गंभीर जखमी झाल्याने सहकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ भुसावळ येथील रिदम हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असता जळगाव येथे हलवण्यास सांगितल्याने आर्किट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!