भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळात खुन प्रकरणी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

भुसावळ (प्रतिनिधी)। शहरातील श्रीराम नगर भागातील रहिवाशी विलास दिनकर चौधरी या तरुणावर पाच ते सहा तरुणांनी मंगळवार २५ ऑगस्ट २०२० रोजी घरात घुसून चाकू हल्ला करून गोळीबार करण्यात आल्याची घटना रात्री ११.०० वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत महिती अशी की, फिर्यादी दिनकर लक्ष्मण चौधरी वय ६५ राहणार श्रीराम नगर भागातील असून यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय न्हावकर, अभिशेक शर्मा, आकाश गणेश पाटील सर्व राहणार श्रीराम नगर भागातील असून यांचा विलास चौधरी सोबत दि. २० ऑगस्ट २०२० रोजी वाद झाला होता. त्याचा राग मनात घरून आरोपींची विलास हा सिमेंटच्या पाईपावर बसून मोबाईल खेळत असतांना अचानक आरोपींची विलास यांच्यावर चाकूने उजव्य हाताच्या कोपऱ्यावर, मनगटावर, दंडावर गंभिर जखमी करत अभिषेक शर्मा यांने त्याच्या कडील पिस्तुल मधून एक गोळी फायर केली. विलासच्या छातीवर, मानेखाली उजव्या साईटला फिर्यादीच्या पत्नीच्या डोक्यावर पिस्तूलने जोरात मारून जखमी केले म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ८००/२०२० भा.द. वि .कलम ३०२,३२३,३४ आर्म अँक्ट ३(२५),३(२७) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शिताफीने तिघे आरोपीना ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे. दि. २६ ऑगस्ट २०२० रोजी फॉरन्सीलॅबच्या पथकाने घटनास्थळी येऊन नमुने घेतले आहे. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मा.भाग्यश्री नवटके, पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे दंडगा संपर्क असलेले पो कॉ विकास सातदिवे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे कृष्णा देशमुख,संदीप परदेशी अशांनी मिळून तिघे आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अनिल मोरे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!