भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळसामाजिक

अंतर्नाद तर्फे सोमवार पासून ऑनलाईन पुष्पांजली प्रबोधनमाला

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा । अंतर्नाद प्रतिष्ठानची फिरती पुष्पांजली प्रबाेधनमाला म्हणजे भुसावळची वैचारीक विश्व व्यापक करणारी चळवळ,तीन वर्षांपासून या उपक्रमातून रसिकांची सांस्कृतिक भूक भागतेय,यंदा तिचं चौथे वर्ष,पण काेराेनाचा काळ असल्याने तिचं स्वरुप काहीसं बदलवावं लागलं आहे.अर्थात यंदा ही प्रबोधनमाला २७, २८ व २९ डिसेंबर असे तीन दिवस ऑनलाइन हाेते आहे.झुम अपच्या माध्यमातून रसिकांन पर्यंत हि प्रबोधनमाला पोहचवण्यात येणार आहे.अंतर्नाद प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर सुध्दा रसिक या प्रबोधन मालेचा लाइव्ह लाभ घेउ शकणार आहेत.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप वसंतराव पाटील यांच्या माताेश्री स्व.पुष्पा पाटील यांच्या स्मरणार्थ वैचारिक चर्चेचं दालन या अभिनव अशा उपक्रमाच्या माध्यमातून उघडलं आहे.उपक्रमासाठी जळगाव येथील कलारसिक विघ्नहर्ता कंस्ट्रक्शनचे अजय बढे यांचे सहकार्य लाभत आहे तर दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि अमोल हरिभाऊ जावळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.नियोजन समितीत प्रदीप सोनवणे,योगेश इंगळे,जीवन महाजन, प्रसन्ना बोरोले, अमित चौधरी, समाधान जाधव, अमितकुमार पाटील, विक्रांत चौधरी,प्रा.श्याम दुसाने, आर डी सोनवणे, शैलेंद्र महाजन, निवृत्ती पाटील, संदीप रायभोळे, राजू वारके, जीवन सपकाळे, हरीष भट, प्रमोद पाटील, भूषण झोपे, सचिन पाटील, प्रा. भाग्यश्री भंगाळे, वंदना भिरूड, यती राऊत, विपश्यना सपकाळे यांचा समावेश आहे. रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष संदीप पाटील, प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, समन्वयक संजय भटकर, सहसमन्वयक देव सरकटे यांनी केले आहे.

असे आहेत तीन विचारपुष्प…
प्रथम पुष्प : २७ डिसेंबर २०२१
वेळ : सायंकाळी ७:०० वाजता
वक्ते : मनोज गोविंदवार, जळगाव
विषय : आयुष्याच बॅलेन्सशीट
द्वितीय पुष्प : २८ डिसेंबर २०२१
वेळ : सायंकाळी ७:०० वाजता
वक्ते : नितीन देशमुख, अमरावती
विषय : प्रश्न टांगले आभाळाला
तृतीय पुष्प : २९ डिसेंबर २०२१
वेळ : सायंकाळी ७.०० वाजता
वक्ते : रवींद्र पाटील, पाचोरा
विषय : संस्कार काळाची गरज

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!