भुसावल परिसरात खुनाची मालिका सुरूच, जुन्या वादातून तरुणाला संपविले
भुसावळ, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। जुना वाद काढत मोटारसायकल जबरदस्तीने जोराने ढकलून देत डोक्यास गंभीर दुखापत करून एका तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना भुसावल जवळील फेकरी उड्डाण पुला जवळ साक्री सर्विस रोडवर घडली .
या संदर्भात मयताच्या भाऊ आकाश शांताराम शेळके, वय २५ वर्ष, रा. फेकरी, वाल्मिक नगर.ता.भुसावल यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांचा लहान भाऊ मंगल शांताराम शेळके ,वय २३ वर्ष याच्यासोबत पुर्वी झालेल्या वाद उकरुन काढून राहुल तुकाराम पाडळे याने दि. १६ चे रात्री १२ ते दि. १७ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, मंगलची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली.तसेच त्याच्याशी झटापट करुन त्याला सिडी डिलक्स मोटारसायकल क्रमांक MH-१९- EB- २०२४ हिच्यावर जबरदस्तीने जोराने ढकलून दिले. तसेच मंगलला गंभीर दुखापत करून त्याचा खुन केला. हा प्रकार दि.१७ रोजी उघडकीस आला. या प्रकरणी संशयित आरोपी राहुल तुकाराम पाडळे, वय २८वर्ष , रा. मु.पोस्ट. फेकरी ता. भुसावळ यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करून याला अटक करण्यात आली असून पुढील तपास परी. उप विभागीय पोलीस अधिकारी सतिश कुलकर्णी हे करीत आहेत.