भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मुंडे भगिनींचे वेट ऍन्ड वाॅच ! समर्थकांचा संताप; भूमिकेकडेही लक्ष..

Monday To Monday NewsNetwork।

बीड(प्रतिनिधी)। पंकजा मुंडे मास लिडर आहेत, ओबीसी आणि वंजारी समाजाची त्यांना साथ आहे हेच भाजपच्या व काही नेत्यांच्या डोळ्यात सलतंय, अशा संतप्त भावना समर्थकांकडून सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत. त्यामुळे निर्णय घ्या, अशी आरोळी समर्थक ठोकत असले तरी आता भुमिका घेण्याची योग्य वेळही नाही आणि राज्यात तसे राजकीय वातावरणही नाही हे हेरुनच भाजपकडून खेळ्या खेळल्या जात आहेत.

अगोदर भागवत कराड यांना राज्यसभेवर खासदारकी व नंतर रमेश कराड यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन एक प्रकारे पंकजा मुंडे यांना चेकमेट देणाऱ्या भाजप नेत्यांनी आता थेट डॉ. भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद दिले आहे. तसे, डॉ. प्रितम मुंडे या दुसऱ्यांदा खासदार आहेत. दोनदाही बहुमताने विजयी झालेल्या आहेत. त्यांच्या भगीनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यामागे जनमत आहे. पण, तरीही प्रितम मुंडे यांना मंत्रीपद टाळणे त्यांच्या समर्थकांना रुचले नाही.त्यामुळेच सोशल मिडीयावरुन संताप व्यक्त केला जात आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडे यांची कायम कोंडी केली जातेय असा समर्थकांचा सुरुवातीपासूनचा आरोप आहे. त्यासाठी समर्थक नेहमी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव घेऊन पोस्ट करत असतात. आताही डॉ. प्रितम मुंडे यांना मंत्रीपदापासून डावलल्याने समर्थकांचा संताप अनावर झाला आहे.

मुंडे भगिनींचे वेट ऍन्ड वाॅच..
पंकजा मुंडे यांनी निर्णय घ्यावा, अशी साद सोशल मिडीयावरुन घालतानाच भाजपच्या काही नेत्यांना दुषणेही दिली जात आहे. दरम्यान, यापूर्वी रमेश कराड व डॉ. भागवत कराड यांना आमदारकी आणि खासदारकी मिळाल्यानंतर त्यांचे जाहीर अभिनंदन करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर कुठलेही थेट वक्तव्य किंवा सोशल मिडीया पोस्ट केलेली नाही. आता त्या नेमके काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!