नराधम मामाचा सख्ख्या भाचीवर अत्याचार
बीड,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। निर्दयी मामाने जवळच्या नात्याला फाटा देत अल्पवयीन सख्ख्या भाचीवर अत्याचार केल्याची खडबडजनक घटना घडली असून निर्दयी सख्ख्या मामान असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा घेत केलेल्या दुष्कृत्या बद्दल बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत नराधम मामा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक वृत्त असे की, पती पासून दूर झालेल्या
कामानिमित्त परळी तालुक्यातील धारावती तांडा परिसरात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही महिला आपल्या सख्ख्या भावाकडे आपल्या अल्पवयीन मुलीसह राहत असून ही महिला वीटभट्टीवर मोलमजुरी करते.
बहिणीचा व भाचीचा असह्य परिस्थितीचा गैरफायदा घेत मामानेच अल्पवयीन भाचीवर अत्याचार केला सदर कृत्य बहिणीला या बाबत माहिती झाल्यावर अत्याचारास विरोध करणार्या आपल्या बहिणीला ही भाऊ मारहाण करत होता.अल्पवयीन भाचीवर अत्याचार केल्याने बहिणीनेच (मुलीची आई) या बाबत भावा विरोधात तक्रार केल्याने
परळी ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.