भुसावळ मध्ये गुटखा विक्रेत्यांवर मोठी कारवाई, गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहरातील तुलसीदास महाराज कॉम्प्लेक्स मधील मे.ओम साई ट्रेडर्स यादुकानात छापेमारी करत सुगंधी सुपारी,पण पराग, सिग्नेचर पण मसाला,बाबा सुगंधी तंबाखू असा सुमारे ८८ हजार ४४५ रूपयांचा माल जप्त केल्याने गुटखा विक्रेत्यांमधे खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहरातील मे.ओम साई ट्रेडर्स दुकान नं.३० या दुकानात विजयसिंग प्रखडसिंग पाटील यांनी राज्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा लपऊन ठेवल्याची माहिती मिळाल्याने अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या दुकानावर छापा टाकून तेथून सुगंधी सुपारी,पण पराग, सिग्नेचर पण मसाला,बाबा सुगंधी तंबाखू रजनी गंधा असा सुमारे ८८ हजार ४४५ रूपयांचा माल जप्त केला.या प्रकरणी बाजारपेठ पोलिस स्टेशनला अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजयसिंग पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.