भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

रेव्ह पार्टी प्रकरणी डॉ.प्रांजल खेवलकर यांच्या वकिलाची मोठी घोषणा

पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सध्या पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणा राज्यभर गाजत आहे. या रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ राव खडसे यांचे जावयासह सह
सात जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मंगळवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने पाच पुरुष आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी आणि दोन महिला आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मात्र आता या प्रकरणात एक नवा वळण आलं असून डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांकडून पोलिसांवर थेट ५० कोटींचा मानहानी दावा दाखल करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

डॉ. खेवलकर यांच्यावर करण्यात आलेली कारवाई हेतुपुरस्सर असून त्यांना अडकविण्यासाठीच हा सापळा रचण्यात आला, असा गंभीर आरोप वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे प्रकरण बनावट असून पोलिसांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देत त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकरणातील महिला आरोपींपैकी एका महिलेच्या पर्समध्ये कोकेन सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, डॉ. खेवलकर यांचे वकील ठोंबरे यांनी सांगितले की, ही महिला पोलिसांनीच पाठवली होती. त्यामुळे हा सारा प्रकार पूर्वनियोजित होता, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!