भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शरद पवारांना मोठा धक्का : जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्र्यांसह आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाचे जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे दोन माजी मंत्री शरद पवार यांची साथ सोडत आहे. तसेच माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असून. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी त प्रवेश केला असल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षाला गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी शरद पवार यांची साथ सोडत आहे. शरद पवार यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबण्याची चिन्ह नाही. शरद पवार गटात असणारे दोन माजी मंत्री, तीन माजी आमदार यांच्यासह महिला प्रदेश सरचिटणीस यांच्या सह समर्थक कार्यकर्त्यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जळगाव जिल्ह्यात शरद पवारांची अर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

या पार्श्वभुमिवर आज मुंबईत आयोजीत भव्य कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचा अजितदादा पवार गटात प्रवेश झाला. यात माजी मंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास गोरख पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, अमळनेर बाजार समितीच्या माजी सभापती तिलोत्तमा पाटील, शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आदींनी आपापल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या मान्यवरांचे पक्षात स्वागत केले.

या प्रवेश सोहळ्याला जिल्ह्यातून आ. अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार व उमेश नेमाडे, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विविध मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतांनाच हा पक्ष प्रवेश सोहळा घडल्याने शरद पवार गटासमोरील आव्हान अजून खडतर होण्याची शक्यता आहे.
तब्बल पाच माजी आमदार आणि अन्य मातब्बरांनी पक्षाचा त्याग करून अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!