शरद पवार राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? जळगाव जिल्ह्यातील बडा नेता भाजपच्या वाटेवर?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पस्ट बहुमत मिळुन नवं सरकार स्थापन झालं. आता शिवसेना ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा महायुतीमधील काही नेत्यांकडून केला जात असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर हे भाजपच्या संपर्कात असून गुलाबराव देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश माहजन यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे.
या आधी गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्यसाठी इच्छूक होते, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडून त्यांच्या प्रवेशाला विरोध होत असल्याने प्रवेश द्यायचा की नाही हे अजून स्पस्ट झाले नाही. आता गुलाबराव देवकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गुलाबराव देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेतल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे आता देवकर नेमका कोणत्या पक्षात प्रवेश करतात, भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गट याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर देवकर यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर हा जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.