बिग ब्रेकिंग : सावदा नगरपालिका निवडणुकीच्या इतिहासात रंजना जितेंद्र भारंबे यांच्या नावे बिनविरोध विजयाचा विक्रम !
सावदा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | सावदा नगरपालिका निवडणुकीत भाजपचे प्रभाग क्रमांक 7 अ मधिल उमेदवार सौ. रंजना जितेंद्र भारंबे यांनी सावदा नगरपालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध विजयाचा विक्रम नोंदवत इतिहास घडवला आहे. मात्र बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सौ .रेखा राजेश वानखेडे यांच्या अर्जाला ए बी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.
ही जागा महिलांसाठी राखीव असून, पहिला मान भाजपच्या उमेदवार रंजना जितेंद्र भारंबे यांना मिळाला आहे. त्यांची नगरसेवक पदासाठी बिनविरोध निवड झाली असून मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत नगरसेवक म्हणून त्यांनी विजय संपादन केलेला असून, सभागृहातील आक्रमक महिला नेतृत्त्व म्हणुन त्यांची ओळख असुन सुस्वभावी व सामाजिक जाणीव ठेवून लोकांची कामे करण्यासाठी त्या सतत अग्रणी असतात.
आताच्या काळात त्यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्ते व हितचिंतकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.


