गुटखा तस्कारांवर मोठी कारवाई, पिता-पुत्राला जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्यावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जातं आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुटख्याची अवैध विक्री केली जात आहे. अशातच गुटख्याची तस्करी करणारे जळगाव येथील सिंधी कॉलनीतील रहिवासी पिता-पुत्राला जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार केल्याचे आदेश काढले आहेत.
जळगाव येथील सिंधी कॉलनीतील रहिवासी रमेश तेजानंद जेठवाणी, वय ५८ वर्ष. व दीपक रमेश तेजवाणी, वय २४ वर्ष. या दोघां पिता पुत्रांना हद्दपारीचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जारी केले आहेत. या दोघांना हद्दपार करण्यात यावे असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या दोघांवर प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याच्या तस्करीबाबत जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असून रमेश तेजानंद जेठवाणी आणि दीपक रमेश तेजवाणी या दोघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी काढले आहेत.