भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

फडणवीसांच्या “त्या” विनंतीवर दिल्लीत हायकामांडचा मोठा निर्णय

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नाही. एक्झिट पोलमध्ये महायुती विजयी होताना दिसत होती, पण निकाल समोर आल्यानंतर महाविकास आघाडीला यश मिळाले. मात्र राज्यातील हा पराभव भाजपा नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे लोकसभेच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारमधून मुक्त करावे अशी विनंती भाजपाच्या हायकमांड कडे केली होती. एकंदरीत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली होती मात्र फडणवीसांची ही विनंती केंद्रीय नेतृत्वाने फेटाळली आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुका होतील असे संकेत भाजपा पक्षक्षेष्ठीनीं दिली आहे. खासदार पीयूष गोयल यांनी पक्ष आणि राज्याच्या नेतृत्वात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पराभवावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (18 जून) नवी दिल्लीत महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली. बैठक पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, विधान सभेसाठी रोड मॅप तयार केला असून तिन्ही पक्षांसोबत निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

राज्यातील नेतृत्वात कोणताही बदल नाही
दरम्यान, खासदार पीयूष गोयल यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही, प्रदेशाध्यक्ष अथवा इतर कोणताही नेतृत्व बदल करण्यात येणार नाही. महायुती संपूर्ण ताकदीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवाची स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यंत्रीपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला होता. त्यामुळे आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात चर्चा होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!