बोदवळमुक्ताईनगर

पत्रकार संघटनेचा मोठा निर्णय : सर्व राजकीय पक्षांच्या बातम्यांवर बहिष्कार, राजकीय वर्तुळात खळबळ

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील बोदवड तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या बातम्यांवर स्थानिक पत्रकार संघटनेने बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत तालुक्यातील पत्रकारांना राजकीय नेत्यांकडून योग्य मान-सन्मान मिळत नसल्याचा आरोप करत पत्रकारांनी हा कठोर पाऊल उचलले आहे.

पत्रकार संघटनेने म्हटले आहे की, बोदवड तालुक्यातील राजकीय नेते आणि पदाधिकारी हे स्थानिक पत्रकारांना डावलून फक्त वरिष्ठ पातळीवरूनच बातम्या प्रसिद्ध करत आहेत. स्वतच्या पक्षांच्या कार्यक्रमांविषयी कोणतीही प्रेस नोट किंवा माहिती पत्रकारांना दिली जात नसल्याने पत्रकारांमध्ये नाराजी आहे. यामुळे स्थानिक पत्रकार आणि राजकीय नेते यांच्यातील संवाद पूर्णपणे तुटला आहे.

निवडणुकीनंतरही बहिष्कार कायम.                   .       .   १५ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होणारा हा बहिष्कार निवडणुकीनंतरही कायम ठेवण्याचा निर्धार पत्रकारांनी व्यक्त केला आहे. पत्रकारांच्या मते, हा निर्णय राजकीय नेत्यांना त्यांच्या वागणुकीचा पुनर्विचार करण्यासाठी भाग पाडेल.

तालुक्यातील या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ऐन निवडणूक काळात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पत्रकार संघटनेच्या या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!