भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीयसामाजिक

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल- डिझेल स्वस्त होणार?

नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स हटविण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार च्या या निर्णयाने ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेतल्यानंतर गेल्या एक महिन्यापासून विंडफॉल टॅक्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर रोड सेस (आयआरसी) हटविण्याबाबत हालचाली सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत उत्पादित होणार्‍या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्ससह आयआरसी रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या निर्णयाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून केंद्र सरकारच्या वतीने संसदेमध्येही ही माहिती दिली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चात्त्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लागू केले होते. यामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले होते. इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना प्रचंड नफा झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारने एक जुलै २०२२ रोजी केंद्र सरकारने विंडफॉल टॅक्स लागू केला होता. विशिष्ट परिस्थितीत पेट्रोलियम कंपन्यांना जादा नफा मिळतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी हा कर लागू करण्यात आला आहे. अन्य देशांच्या धर्तीवर भारतानेही देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादक आणि निर्यातदार यांच्यावर विंडफॉल टॅक्स लावला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!