जळगाव

मोठी बातमी : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सोने — चांदीच्या दरा बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. सोन्याचा दर ८० हजारांच्या वर गेला होता.

आज सोन्याचे दर तोळ्यामागे तब्बल दोन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर चादींच्या दरात किलोमागे तब्बल आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचे दर चार तासांपूर्वी प्रती तोळा ७९ हजार होते. तर चार तासांमध्येच भावात दोन हजारांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर ७७००० रुपये प्रती तोळ्यावर आले आहेत.

तर चांदीच्या दरात देखील मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या चार तासांमध्ये चांदीचे दर किलोमागे तब्बल आठ हजार रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीचे दर आता प्रती किलो ९३००० हजार रुपये इतके आहेत. चांदीच्या दरात किलोमागे आठ हजार तर सोन्याच्या दरात प्रती तोळा दोन हजार रुपयांनी घसरण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!