भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

मोठी बातमी; राज्यातील १८ लाख रेशनकार्ड रद्द

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात अनेक शिधापत्रिका धारक मोठी नोकरी आणि बलाढ्य पगार असून देखील शिधापत्रिकाच्या योजनांचा गैरफायदा घेत लाभ घेत आहेत. शिधापत्रिका धारकांना राज्य सरकारकडून मोफत अन्न धान्याचा पुरवठा केला जातो. अशा सर्वांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून राज्यातील तब्बल १८ लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. यामुळे अनेक मोठा धक्का बसला आहे.

आधार कार्ड च्या सहाय्याने शिधाकार्ड धारकांचे ई-केवायसी करणे ची मोहीम सुरु आहे. या मोहिमेमुळे अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विविधा खासगी कंपन्यांतील गलेलठ्ठ पगारदार, व्यापारी, व्यावसायिकांकडे सुद्धा रेशनकार्ड असल्याचे निदर्शनास आले आहे.

या मोहिमेत शिधा पत्रिका धारकांच्या संपूर्ण कुटुंबाची पूर्ण माहिती घेतली जात असून ओळखपत्र तपासले जात असून
त्यात मृत्य झालेल्या व्यक्तीची नावे शिधा पत्रिकेतून कमी केली जात आहेत. अनेक लोक कुटुंबातील मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने धान्य घेत आहेत. या लोकांवर या मुळे वचक बसला आहे.

या मोहिमेत आतापर्यंत राज्यात तब्बल १८ लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे. दीड कोटींहून अधिक कार्डधारकांची ई-केवायसी प्रलंबित आहे. आधार लिंकसाठी केंद्र सरकारच्या ई-केवायसी मोहिमेत राज्यातील १७. ९५ लाख रेशन कार्ड रद्द झाल्याचे आकेडवारीत समोर आले आहे.

राज्याची राजधानी मुंबईत सर्वाधिक तब्बल ४ लाख ८० हजार रेशन कार्ड रद्द झाले आहेत. तर ठाण्यात १ लाख ३५ हजार रेशनकार्ड रद्द झाले आहेत. राज्यातील एकूण ६. ८५ कोटी कार्ड पैकी ५. २० कोटींचे ई-केवायसी पूर्ण झाले आहेत. १.६५ कोटींची ई केवायसी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच भंडारा, गोंदिया, सातारा जिल्हे ई-केवायसीत आघाडीवर आहेत. तर रेशनकार्ड ई-केवायसी मोहिमेत मुंबई, पुणे, ठाणे हे जिल्हे मागे आहेत. रेशन कार्ड धारकांना ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या कार्डांमुळे बांगलादेशी नागरिकही लाभ घेत आहेत. त्या बांगलादेशी नागरिकांचे धाबे दणाणले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!