भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा संदर्भात अजित पवार यांचे संकेत…..

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बीड सरपंच हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनामा संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. बीड हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेत आरोप केले आहेत. तसेच विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. विरोधकांचं एक शिष्टमंडळ आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी गेलं. या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे धनंजय मुंडे यांच्याबाबत तक्रार करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही दबाव वाढला आहे.

आज दुपारी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया न देता परत जाणं पसंत केलं. मात्र या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची मोठी उत्सुकता होती. अजित पवार धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार का? याची चर्चा सुरू असताना या बाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी, न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कुठलाही निर्णय घेणार नाही. या चौकशीत जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करणार तसेच ” जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही”, असं अजित पवार यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी आपलं मत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा सध्या तरी राजीनामा घेतला जाणार नाही, अशी माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!