महाराष्ट्र

मोठीं बातमी : वीज ग्राहकांना मोठा दिलासा ! वीज होणार स्वस्त

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीज दर प्रस्तावामध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीज दरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागितली आहे.राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना लवकरच स्वस्त दराने वीजपुरवठा केला जाणार आहे. सोबतच दिवसा वीज वापरल्यास ग्राहकांना अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे.

येत्या एप्रिलपासून याची कार्यवाही होण्याचे संकेत असून त्यामुळे वीज दरात प्रतियुनिट ८० पैसे ते एक रुपयापर्यंत कपात होऊ शकते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षांत ऊर्जा परिवर्तासाठी भरीव काम करून सौर ऊर्जा वापराला महत्त्व दिले आहे. सौर ऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळाल्यामुळे महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यासोबतच सौर ऊर्जा दिवसा मिळणार असल्याने त्यावेळी जे घरगुती ग्राहक वीज वापरतील त्यांना प्रत्येक युनिटमागे ८० पैसे ते १ रुपया सवलत देण्याचा प्रस्ताव मांडणेही महावितरणला शक्य झाले आहे.

आयोगाकडे महावितरणने विद्युत नियामक सादर केलेल्या प्रस्तावानुसार घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरासाठीच्या दरात सवलत देण्यात येईल. आर्थिक वर्ष २०२५ – २६ मध्ये प्रति युनिट ८० पैसे, २०२६ -२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८मध्ये ९० पैसे, २०२८-२९ मध्ये ९५ पैसे आणि २०२९-३० या वर्षात १ रुपया सवलत देण्यात येईल. आयोगाने मान्यता दिल्यानंतर १  एप्रिलपासून ही सवलत सुरू होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!