भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीय

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीचा सर्वात पहिला निकाल भाजपने जिंकला

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अवघ्या काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच भाजपने आपल खातं खोललं आहे. भाजपने गुजरात मधील सुरत या जागेवरून विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत सुरत लोकसभेतून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला होता. प्रमुख विरोधी उमेदवाराचा उमेदवारी अर्जच बाद झाल्यामुळे दलाल यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. कुम्भानी यांचा अर्ज रद्दबातल झाल्यानंतर या जागेवर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या इतर उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे या जागेवर निवडणूक लढवणारे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांना बिनविरोध विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. हा अंदाज खरा ठरणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी एकूण ९६.८८ कोटी मतदारांनी नोंदणी केली होती. त्यानंतर ६४.२ कोटी प्रत्यक्ष मतदान झाले. यात ३१.२ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तर संपूर्ण मतदानाची प्रक्रिया एकूण ८० दिवस चालली. दरम्यान, दिल्लीतील भाजप मुख्यालयात निकाला आधीच विजयाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!